Share

तब्बल सात वर्षापासून रखडलेली ग्रामीण रुग्णालयाची कामे होणार कधी?

Published On: 

लातूर : मागील वर्षभरापासून कोरोना महामारी आपला कहर दाखवत आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगाच्या आरोग्य यंत्रणेला आणखीन आधुनिक करण्याचे काम सुरु आहे. पण त्या उलट जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांकडे लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या निर्मितीला जवळपास २१ वर्षे पूर्ण झाले. पण तालुक्यातील विकास कामाचे केवळ उदघाटने करून कोनशीला लावलेल्या दिसत आहेत. पण अनेक शासकीय ऑफीस आज ही भाड्याच्या जागेत आहेत.

गेल्या महिन्यातच उदगीर तालुक्यातील वाढवणा गावात ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी कोटीवर बजेट राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या मतदार संघात मंजूर करून आणले. पण शिरुर अनतपाळ येथे तब्बल सात वर्षापासून अर्धवट अवस्थेत असलेले ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नाही. तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम निधी अभावी गेल्या सात वर्षापासून रखडले आहे. सात वर्षाच्या काळात आमदारांनी लक्षे दिले नसल्यामुळे लाखो रुपये खर्चुन बांधलेली इमारत धूळखात पडून आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी आवश्यक निधीसाठी सुधारीत प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. पण अद्यापपर्यंत निधी काही उपलब्ध झाला नाही. २०१३ मध्ये पायाभरणी झालेल्या या ग्रामीण रुग्णालयाचे गेल्या सात वर्षापासून काम रेंगाळले आहे. निधी उपलब्ध झाल्यास काम पूर्ण होऊन तालुक्यातील गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार असून याकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!