Share

सिद्धार्थ हॉस्टेलची इमारत लवकरच उभारणार – रामदास आठवले

Published On: 

मुंबई  – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन दुःखाचा दिन असला तरी तेवढाच आमच्या साठी प्रेरणा दिन आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आमची शक्ती आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व अथांग सागराचे रूप आहे. शांती चे स्तूप आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरच आमची प्रेरणा आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले.

वडाळा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पीपल्स एज्युकेश सोसायटीच्या डॉ.आंबेडकर कॉलेज मध्ये आयोजित अभिवादन सभेत ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी सिद्धार्थ हॉस्टेल ची भव्य इमारत लवकरच उभारण्यात येईल.त्यात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येईल अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.

त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ना आठवले म्हणाले.यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ना रामदास आठवले यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला .

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!