Share

‘शेतकरी आपल्या एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, हे तर केंद्रातील मोदी सरकार आहे’

Published On: 

🕒 1 min read

जळगाव:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे, तो आपल्या एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला ते सरळ करतील, असा सणसणीत टोला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रांतील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला लगावला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जळगाव येथील रेल्वे स्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे, तब्बल ५२ टक्के रोजगार देणारी फॅक्टरी शेतकरी आहे. त्याच शेतकऱ्यावर आज केंद्र सरकार अन्याय करीत आहे. देशातील याच शेतकऱ्यांनी त्यांना दिल्लीच्या तख्वावर बसविले आहे, त्याच तख्तावरून त्यांना खाली उतरविण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आडवू नका, तो तुम्हाला आडवं करून टाकेल ज्या बुरूजावर बसविले आहे, तोच तो ढासळून टाकेल. केंद्रांतील भाजप सरकारने हे लक्षात घ्यावे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!