Share

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले एक महिन्याचे मानधन

Published On: 

चिखली : संसर्गजन्य रोग असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात झपाट्याने होत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक जिल्हे, महानगरे व शहरांमध्ये हा जिवघेणा आजार धडक मारत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासन, प्रशासन व समाज यातील प्रत्येकाने तातडीची पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रयत्नांमध्ये स्वतः चे योगदान देण्याच्या उद्देशाने आ. श्वेताताई महाले यांनी आपले एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देण्याची घोषणा केली आहे.

राज्यभरातच नव्हे तर देश व जगात थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे सगळेच मेटाकुटीला आलेले आहे. जगात आर्थिक मंदी तर राज्याची आर्थिक स्थितीसुद्धा हलाखीची झालेली आहे. त्यामुळे फुलं ना फुलाची पाकळी म्हणून आपले विधानसभा सदस्यत्वाचे एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी आ. श्वेताताई महाले यांनी देऊ केले आहे.

लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून जनतेची सेवा करावी.

रात्र वैऱ्याची आणि दिवस दुष्मनांचा आहे. कोरोना नावाच्या शत्रूने चहुबाजूंनी जनतेला घेरलेले आहे. शत्रू नकळत कधी कुठे हल्ला करेल आणि कुणाला धारातीर्थी पाडेल याचा नेम नाही . सगळ्यांचे काम बंद आहे . त्यामुळे दाम नाही . किती दिवस घरात रहावे लागेल याचा नेम नाही . घरातली रसद संपेपर्यंत सर्व धीर धरतील परन्तु शत्रूने घेरलेले असल्याने रसदचा पुरवठा होऊ शकत नाही .ह्या कठीण काळात नगराध्यक्ष, नगरपालिका चे सदस्य,जिल्हा परिषद , पंचायत समिती सभापती, सदस्य , ग्राम पंचायत, सदस्य यांनी तसेच सर्व सरपंच यांनी जागरुक राहून जनतेची सेवा करावी असे आवाहन आ. महाले यांनी केले. जनतेला त्रास होता कामा नये. सर्व परीक्षा रद्द झाल्या परतु, ही सर्व लोकप्रतिनिधीची परीक्षा असल्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोरोना ला हरवण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!