🕒 1 min read
मुंबई – इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप ही खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कॉंग्रेस नेत्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप आमदार श्वेता महाले यांनी देखील कॉंग्रेसला या निमित्ताने टोला लगावला आहे. समर्थकांनी फक्त नेत्याचे नाव घेतले आणि आख्खे लाचार कोसळले आणि खड्यात गेले. मात्र जनता हुशार आहे ते स्वतः व देशाला आता खड्यात जाऊ देणार नाही…. मुक्या जनावरांना कळतय ‘गाढवांचा’ भार उचलायचा नाही असे म्हणत कॉंग्रेसला महाले यांनी डिवचले आहे.
दुसऱ्या बाजूला भाजप नेते प्रसाद लाड यांनी भाई जगताप यांच्यावर खोचक टीका केली आहे. गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाई जगताप बालंबाल बचावले… मुंबईतील आंदोलनाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- ‘आईचं दुख: फक्त आईलाच समजतं’ ; पडळकरांनी घेतली लोणकर कुटुंबियांची भेट
- आ.मेटेंची मंत्री परबांसोबत बैठक; एमपीएससी उत्तीर्ण ६१ मुलींच्या निवडीचा प्रश्न मार्गी
- टीम इंडियाच्या सुरक्षिततेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

