🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल २० यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स ब्लॉक केल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जगभरातील अनेक मोठ्या देशांनी याची दखल घेतली याचा मला आनंद आहे. यूट्यूबनेही पुढे येऊन ब्लॉक करण्याची कारवाई केली.”
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या २० यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान भविष्यात भारताविरुद्ध कट रचणे, खोटे पसरवणे आणि समाजात फूट पाडणे यासाठी कारणीभूत असलेल्या चॅनल आणि वेबसाईचवर कारवाई केली जाईल,” असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
का बंद केले २० यूट्यूब चॅनेल?
मंत्रालयाने डिसेंबरमध्ये केलेल्या कारवाईवर एका निवेदनात म्हटले होते की, “ही २० यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या समन्वित प्रचार नेटवर्कशी संबंधित आहेत आणि भारताशी संबंधित विविध संवेदनशील विषयांबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत. काश्मीर, भारतीय लष्कर, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपिन रावत इत्यादी विषयांवर समन्वित पद्धतीने फूट पाडणारा मजकूर पोस्ट करण्यासाठी या चॅनेलचा वापर केला जात असल्याचे त्यात म्हटले होते.”
विरोधकांची मुस्कटदाबी ठरता कामा नये-कोल्हे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हे म्हणाले, “खोटं पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रीअनुराग ठाकूर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पत्रकारिता या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे पावित्र्य आणि विश्वासाहर्ता अबाधित राहावी यादृष्टीने या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी आजकाल बऱ्याच अंशी प्रसारमाध्यमांवर “गोदी मिडिया” अशी टीका होत असताना केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील विरोधकांची मुस्कटदाबी ठरता कामा नये हीच अपेक्षा.”
महत्वाच्या बातम्या :
- चक्क रश्मि देसाईनं लगावली देवोलिनाच्या कानशिलात; व्हिडीओ व्हायरल
- नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचीच ‘पंचाईत’; फडणवीसांचा टोला
- बांग्लादेशीय अभिनेत्री प्रकरण: पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक
- “गोष्ट तशी छोटी मात्र शिकवण खूप मोठी”; औरंगाबादच्या पोलीस अंमलदाराचा फोटो का होतोय व्हायरल? जाणून घ्या!
- ‘राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जमतंय, ही गोष्ट भाजपला पचत नाही’; नवाब मलिकांचे वक्तव्यं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
