Share

चक्क रश्मि देसाईनं लगावली देवोलिनाच्या कानशिलात; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोटयापडद्यावरील बिग बॉस (Bigg Boss) हा टीव्ही शो सर्वाधिक वादग्रस्त तसेच मनोरंजक आहे. मात्र बिग बॉस १५ भांडण आणि वादासाठी अधिक लोकप्रिय ठरत आहे. चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखल्या रश्मि देसाईनं (Rashmi Desai) देवोलिनाचा (Devolina Bhattacharjee)  वाद शिगेला पोहंचलेला दिसत आहे.

दरम्यान बिग बॉस १५ चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर (social media) बराच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रश्मि आणि देवोलिना यांच्यात टास्कमध्ये झालेलं भांडण. ‘तिकिट टू फिनाले’ (‘Ticket to Finale’ task) हा टास्क जिंकण्याच्या नादात रश्मि आणि देवोलिना यांना त्यांच्या मैत्रीचाही विसर पडलेला दिसत आहे. एवढंच नाही तर टास्क जिंकण्यासाठी या दोघी एकमेकांशी भांडताना आणि मारामारी करताना दिसल्या. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

घरातील सदस्यांसाठी व्हीआयपी झोनमध्ये जागा मिळवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. रश्मि आणि देवोलिनापैकी कोणालाच ही संधी गमवायची नाही. दोघीही राखीला आपापल्या बाजूनं निर्णय देण्यास सांगतात. पण राखी त्या दोघींमध्ये भांडण लावण्याचं काम करते. विशेष म्हणजे राखी यात यशस्वी होते. रश्मि आणि देवोलिनामध्ये जोरदार भांडण झाल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/tv/CY8HdvTlfge/?utm_source=ig_web_copy_link

एवढं नाही तर या दोघांचं भांडण पुढे जाऊन एवढं वाढतं की रश्मि रागाच्या भरात देवोलिनाच्या कानशिलात लगावते. सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. आता बिग बॉस रश्मिच्या या वर्तनावर तिला काय शिक्षा देतात याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!