🕒 1 min read
Amol Kolhe | मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांनी राज्यपाल पदावरुन पायउतार व्हावे अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्यात होणाऱ्या या विरोधानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहले आहे.
“महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही. माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले”, असे या पत्रात म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सवाल उपस्थित केलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रावरील तारीख पाहिली तर ते ६ डिसेंबर रोजीचं आहे. ते आज १२ डिसेंबर रोजी कसं बाहेर आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे? काय हेतू आहे?, असे सवाल खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलेत.
जर राज्यपाल यांनी पत्रात लिहिलंय की त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. असं असेल तर वारंवार तशी वक्तव्य का येतात?, असंही अमोल कोल्हे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. चंद्र-सूर्य आकाशात आहेत, तोपर्यंत त्यांचं तेच स्थान असेल. त्यामुळे शिवरायांविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य का होतायत, याचंही उत्तर मिळणं अपेक्षित आहे, असं मत अमोल कोल्हे यांनी मांडलं.
काय म्हटलंय पत्रात?
माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत होते. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो.
आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही. आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “सूर्यावर थुंकणारे व्यासपीठावरती बसतात, अन् पंतप्रधान…”; संजय राऊतांची सडकून टीका
- Best Mileage Car Option | ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या कार
- Jitendra Awhad | शाईफेक प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं…”
- IND vs AUS | हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मंधानाने केली ‘ही’ कामगिरी
- IND vs BAN | पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रोहित, जडेजा आणि शमीच्या जागी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
