Share

वैदर्भीय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, संत्रा रेल्वेने जाणार बांगलादेशात

Published On: 

नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल किफायती दरात बांगलादेश येथे निर्यात करता यावा, यासाठी विशेष किसान रेल सुरु करण्यात यावी म्हणून नितीन गडकरी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्ण पाटील आणि इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विदर्भातील संत्री आता बांगलादेशात पोहोचणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रस्तावाला रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वार्षिक उत्पादनाच्या दोन तृतीयांश सुमारे अडीच लाख टन संत्रा दरवर्षी बांगलादेश येथे निर्यात करण्यात येतो.

मात्र, थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्त्याने संत्र्यांची मालवाहतूक होते. विदर्भातून बांगलादेशपर्यंत रस्त्याने मालवाहतूक करताना साधारणत: ७२ तास लागतात. जर किसान रेल्वे सुरु झाल्यास ३६ तासात शेतकऱ्यांचा माल बांगलादेशच्या बाजारात उपलब्ध होवू शकेल. तसेच निर्यातीच्या खर्चामध्ये कपात होईल आणि त्यामुळे मालाची गुणवत्ता चांगली राहील. रेल्वे विभागाने नितीन गडकरी यांच्या या प्रस्तवाला हिरवा कंदील दाखविला असून लवकरच याचा रोडमॅप तयार करण्यात येईल, असे आश्वासन सोमेश कुमार यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!