नागपूर : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्याचे नाव घेत नाहीये. जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शिरकाव केल्यानंतर राज्यपालांसह राज्यातील मंत्री यांच्या बंगल्यांवरही कोरोनाने हल्लाबोल केला आहे. आज राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुंबई कार्यालयातील १० जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय दुबे यांनी दिली.
कोरोना आढावा बैठकीला येणारनागपुरात शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. राऊत यांच्या कार्यालयातील १० जण कोरोनाबाधित झाल्याने ते आजच्या बैठकीला येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण मी आणि गृहमंत्री देशमुख बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे डॉ. राऊत यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. पण पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार स्वतः कोरोनाबाधित असल्यामुळे ते बैठकीला येणार की नाही, याबाबत सांगता येणार नाही, असेही डॉ. राऊत म्हणाले.
ऊर्जा विभागातील १० जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर डॉ. नितीन राऊत यांनीही स्वतःची कोरोना चाचणी करवून घेतली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण त्यांचे पीए, ओएसडी, ऑपरेटर, स्टाफमधील काही लोक आणि कुक, अशा १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. राऊत यांनी आपले मुंबई आणि नागपूरचे कार्यालय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना किमान सात दिवस तरी विलगीकरणात ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- कोरोनाची धास्ती कायम, येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय बंद ठेवण्याची होतेय मागणी
- मुंबई महापालिकेने दिली आणखी एक नोटीस,कंगणा रनौतची अडचण वाढली
- मराठा आरक्षणासाठी युक्तिवाद करु नये असं फडणवीसांनीच सांगितलं होतं- महाधिवक्ता कुंभकोणी
- राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरं उघडावीत नाही तर आम्हाला स्वतः उघडावी लागतील: भाजप
- सर्व नागरिकांनी नियम पाळावे, आता लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


