🕒 1 min read
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसत आहेत. यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. या टीकांना आता स्वतः श्रीकांत शिंदे यांनीं प्रत्युत्तर दिल आहे.
श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण –
मला वाटतं हे सर्व हस्यास्पद आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम आहे. त्यांच्या गैरहजेरीत कोणाला सांभाळायची गरज नाही. हे आमचं ठाण्यतील निवासस्थान आहे. आम्ही दोघं इथे असतो मी कुठे मंत्रालय वर्षा बंगल्यावर बसलोय असं नाही हे आमचं ठाण्यातील घर आहे. आम्ही दोघेही या ठिकाणी बसतो लोकांचे गाऱ्हाणे एकतो. इथे मुख्यमंत्री बसतात मोवेबल बोर्ड आहे. हि घराची व्यवस्था आहे. मुख्यमंत्री खुप सक्षम आहेत. विरोधकांच्या पायाची वाळू सरकायला लागली आहे. लोकांना माहीत आहे कोण काय करत. आपण कोण काय म्हणतय याकडे लक्ष देत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादीने नेमके काय आरोप केले?
रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूये. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’ अशी टीका वरपे यांनी केली आहे.
पुढे वरपे म्हणाले कि, कदाचित राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचं काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं. राज्याचा कारभार नेमका कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय, तो ते करतोय, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “उरलेले दोन चारजण वाचवा, नाही तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- New Smartphone Launch | Tecno Pova Neo 5G ची लॉन्चिंग तारीख जाहीर, जाणून घ्या!
- NCP । श्रीकांत शिंदे बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? राष्ट्रवादीकडून ‘तो’ फोटो ट्विट
- Rohit Pawar | “सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही”
- MNS । फक्त चार खासदार, तरी वाजवतात बाजा, पोरीपुरताच उरलाय, साडेतीन जिल्ह्याचा राजा; मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
