मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात टिपा-टिप्पणी होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी विकास कामांवरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देत यावेळी मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांवर टीकेचा बाण सोडला आहे.
अजित पवार यांच्यावर श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोलः
अजित पवार हे शो नाही, हे पहाटेच्या फ्लॉप शो सारखे आहेत, हे ‘शो’ले आहेत. एव्हरगिन ब्लॉकबस्टर सारखा, हिंदुत्वचं तेज आणि विकास कामांच्या ट्रेलरनेच यांना धडकी भरली, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या ट्विटद्वारे अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अर्थातच शिंदे यांनी पुन्हा पवारांना डिवचण्याचं काम केल्याने आता पवार काय प्रतिक्रीया देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
अजित पवार यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून डिवचलं होते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतल्या. शिवसेना प्रमुखांच्या उपस्थित प्रत्येक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याच्या सभा झाल्या. पण आता ज्यांच्या हातात पॉवर आहे, ते पाहिजे तशा गोष्टी करतात, असं पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्याः
- Shrikant Shinde | “दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले”
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंना राज्यपालांकडून धक्का! मविआच्या 12 आमदारांची यादी रद्द
- Sudir Mungatiwar | बाई म्हणत हिनविणे म्हणजे बाईचा-आईचा अपमान – सुधीर मुनगंटीवार
- Ashish Shelar | “पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे”
- Congress Rally | “राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

