Share

नागपूरमध्ये ‘उंगली दिखाओ-आवाज उठाओ’ अभियान ;प्रशासन व लोकप्रतिनिधींचे वेधले लक्ष

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, अधुरी नाले सफाई, कचर्‍याचे ढीग, मेनहोलची झाकणे हा समस्यांकडे महानगरपालिकेने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व खड्डे बुजवण्याची मोहिम मनपाने हाती घेतली मात्र अजूनही अनेक वस्त्यांमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. या समस्यांकडे मनपा प्रशासन व जनप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने ‘उंगली दिखाओ-आवाज उठाओ’ हे अभियान सुरु केले आहे.

उत्तर, मध्य, पूर्व व दक्षिण नागपूर परिसरात हे अभियान राबविण्यात आले. फोरमच्या सदस्यांनी जिथे समस्या आहेत त्याठिकाणी बोट दाखवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्याच्या तोंडावर महानगरपालिकेने नाले सफाई सुरु केली होती मात्र अनेक नाल्यांमध्ये अजूनही कचर्‍याचे ढीग साचल्याचे दिसून आले आहेत. नाल्यांच्या भींतींवर झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत शिवाय नाल्यातला गाळ काठावर जमा केल्यामुळे पहिल्याच पावसात तो नाल्यात वाहून गेल्याचे दिसते त्यामुळे नाल्यात चिख्खल जमा होवून पाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबतीतही महानगरपालिका गंभीर नाही. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा असे निर्देश महापौरांनी सर्व झोनला दिले होते मात्र शहरात अनेक ठिकाणी खड्डे आहे त्या स्थितीत आहेत. निकृष्ट साहित्य वापरामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळणी झाल्याचे पहायला मिळते. अनेक ठिकाणी मेनहोलची झाकणे गायब झाल्याने अपघाताचे नवे स्पाॅट शहरभर तयार झाल्याचे या अभियानादरम्यान लक्षात आले.

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शहरातील समस्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केवळ सोपस्कार म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी या समस्यांकडे पहायला हवे. जोपर्यंत या समस्या सोडविल्या जात नाही तोपर्यंत नागपूर सिटिझन्स फोरम या समस्यांकडे बोट दाखवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल असे मत फोरमचे पदाधिकारी अभिजीत झा यांनी व्यक्त केले.

जिथे समस्या दिसेल त्याठिकाणी नागरीकांनी बोट दाखवून फोटो काढावेत व ते सोशल मिडीयावर वायरल करावेत असे आवाहन फोरमचे पदाधिकारी गजेंद्रसिंग लोहिया यांनी केले आहे. सोबतच या समस्यांबद्दल नागपूर लाईव सिटी एपवर तक्रारी कराव्यात असेही ते म्हणालेत. येत्या काळात जन चौपालच्या माध्यमातून प्रभागांमध्ये जावून या अभियानाचा विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!