🕒 1 min read
मुंबई: ऑनलाइन फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato लवकरच १० मिनिटांत अन्न डिलिव्हरी सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. झोमॅटो गुरुग्राममध्ये १० मिनिटांत अन्न वितरणाची (Food Delivery in 10 Minutes) चाचणी घेण्यासाठी पायलट प्रोजेक्ट चालवणार आहे. ‘झोमॅटो इन्स्टंट’ नावाची त्यांची जलद वितरण प्रणाली चालवणार आहे. मात्र यावरूनच राष्ट्रवादी नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत झोमॅटोकडे मागणी केली आहे.
“डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची @zomato ची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 22, 2022
दरम्यान कंपनी अगोदर “फिनिशिंग स्टेशन्स नेटवर्क” मधून जलद वितरण पूर्ण करण्याचा विचार करत असून गुरुग्राममध्ये अशी चार स्थानके असतील. मागणीचा अंदाज आणि हायपरलोकल प्राधान्यांच्या आधारावर, प्रत्येक फिनिशिंग स्टेशनमध्ये जवळपास २०-३० वस्तू असतील ज्या दिलेल्या परिसरात सर्वाधिक विकल्या जातात. ही गोदामे डिश-लेव्हल डिमांड प्रेडिक्शन अल्गोरिदम आणि इन-स्टेशन रोबोटिक्सने सुसज्ज असतील, असे कंपनीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO : तू खरं सोनं आहेस..! ‘मिडनाइट रनर’ प्रदीपच्या संघर्षाला क्रिकेटपटूंनी ठोकला सलाम!
- Women’s WC 2022: ‘रेकॉर्ड्सची राणी’ मिताली राजच्या नावे आणखी एक रेकॉर्ड; यावेळी मात्र नकोसा!
- मोठा खुलासा! ८६% शेतकरी संघटना रद्द केलेल्या कृषी कायद्याने खूश
- “शेत खाणाऱ्या कुंपणापासून बचावासाठी वाय दर्जाची सुरक्षा…”, भातखळकरांचा शिवसेनेला टोला
- “आम्हा मुंबईकरांना नागपूर प्रिय”; संजय राऊतांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
