Share

धक्कादायक! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्यूमुखी

Published On: 

औरंगाबाद : शहरात विविध प्रकारच्या पक्षांचे तसेच शेकडो प्रकारच्या माशांचे अधिवास असलेल्या सलीम अली सरोवरात रविवारी (दि.२१) हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. पाण्यात होत असलेल्या यूट्रिफिकेशनमुळे हा प्रकार घडल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली.

शहरातील तसेच विदेशातील स्थलांतरित पक्षांसाठी सलीम अली सरोवर महत्वपूर्ण ठरले आहे. तसेच या तलावात शेकडो प्रकारचे मासेदेखील आहेत. मात्र गेल्या काही वर्षात सरोवरात परिसरातील घाण पाणी मिसळत असल्याने तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यातच रविवारी सकाळी अचानक हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आले. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील लोकांनीही गर्दी केली होती. या आधीदेखील तलावात अशा घटना घडल्या आहेत.

पर्यावरण तज्ज्ञ व सृर्ष्टी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांच्या मते, परिसरातील घाणी पाणी तलावात येऊन मिसळत असल्याने हा प्रकार घडला आहे. यावर त्वरित बंदी आणून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकाराला युट्रोफिकेशन (सुपोषण) म्हटले जाते. तलावाच्या तिन्ही बाजूंनी ड्रेनेजचे पाणी तलावात येऊन मिसळते.

याबाबत आम्ही मनपा आयुक्तांकडे वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत. मात्र समाधानकारक दखल घेतली जात नसल्याने अखेरीस आजची घटना घडलेली आहे. तलावातील प्रदूषणाबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते प्रकरण अद्याप सुरु असल्याचे डॉ. पाठक यांनी म्हटले आहे.

ड्रेनेज, कीटकनाशके आणि डिटर्जंट यांचे संमिश्र रसायन म्हणजे युट्रोफिकेशन असते, हे सगळे एकत्रितपणे तलावात सोडले जाते. यामुळे फायटोप्लॅन्स नावाचे शैवाळ वनस्पती वाढीस लागते. यामुळे पाण्यावर पिवळा थर निर्माण होतो. या थरामुळे पाण्यात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यातूनच माशांचा मृत्यू झाल्याचे डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.

मनपा अधिकार्‍यांनी केली पाहणी

सरोवरातील मासे मरण पावल्यानंतर रविवारी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, के.एम. फालक, अनिल तनपुरे या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. पाणी दूषित असल्याचा प्राथमिक अंदाज वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यात कोणीतरी विष कालवले, असा अंदाज आहे. मृत मासे आणि पाण्याचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!