Share

धक्कादायक : ‘त्या’ १७ कोटींचा हिशेबच नाही!; देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या

Published On: 

नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवासस्थान, कॉलेज कार्यालयाची प्राप्तीकर विभागाने सलग दोन दिवस झाडाझडती घेतली. कारवाईदरम्यान आढळलेली कागदपत्रे, पावत्या यांच्या आधारे जवळपास सतरा कोटींचा अधिकृत लेखी हिशेब नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.

प्राप्तीकर विभागाने १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संस्थांवर छापे टाकले होते. या कारवाई दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे स्पष्ट केले आहे. शोध मोहिमेदरम्यान सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की सुमारे १७ कोटी रुपयांचे उत्पन्न दडवण्यात आल्याचे नमुद केले आहे

प्राप्तीकर विभागाने नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये ३० ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण केले होते. या कारवाई दरम्यान, अनेक कागदपत्रे आणि इतर पुरावे सापडले. या समूहाकडून चालवण्यात येत असलेल्या ट्रस्टला दिल्लीतील कंपन्यांकडून ४ कोटी रुपये बनावट देणगी मिळाल्याचा पुरावा सापडला आहे. ट्रस्टच्या तीन शैक्षणिक संस्था वाढीव खर्चात सहभागी असल्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन अंशत: रोख स्वरूपात पुन्हा परत घेतले होते. असे अनेक पुरावे सापडले असून ही रक्कम १२ कोटींपेक्षा जास्त आहे.याशिवाय ट्रस्टने पावत्या दडपण्या व्यतिरिक्त प्रवेशाची व्यवस्था करण्यासाठी दलालांना मोठी रक्कम दिली आहे. ती सुमारे ८७ लाख रुपये असून ती पूर्णपणे बेहिशेबी आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!