नवी दिल्ली : १९ सप्टेंबर पासून दुबई येथे आयपीएलला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे स्थगित झालेला २०२१ चा हंगाम पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक खुश आहेत. मात्र तालिबानींच्या भयाखाली वावरत असलेल्या अफगाणी रसिकांना याचाही आनंद घेता येणार नाहीये. तालिबानने अफगाणिस्तानात आयपीएलच्या प्रक्षेपणास बंदी आणली आहे.
तालिबानने याआधीच अफगाणी नागरिकांवर अनेक नियमे लादली आहे. त्यातच आता तालिबानींनी आयपीएल इस्लाम विरोधी आहे, असे सांगितले. यात त्यांनी म्हंटले आहे की, आयपीएलमध्ये दाखवला जाणारा कंटेंट इस्लामाच्या विरुद्ध आहे. स्पर्धेदरम्यान चिअर लीडर्स नाचतात, इस्लाम महिलांना असे करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे तालिबानने आयपीएल प्रक्षेपणास बंदी घातली आहे.
Afghanistan national ???? ???? will not broadcast the @IPL as usual as it was reportedly banned to live the matches resumed tonight due to possible anti-islam contents, girls dancing & the attendence of barred hair women in the ????️ by Islamic Emirates of the Taliban. #CSKvMI pic.twitter.com/dmPZ3rrKn6
— M.Ibrahim Momand (@IbrahimReporter) September 19, 2021
आयपीएल स्पर्धेत अफगाणिस्तानचे दोन खेळाडू खेळत आहेत. राशीद खान आणि मोहंमद नबी यांनी तालिबानचा राज्य येताच देश सोडले आहे. यामुळे त्यांना लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. अफगाणिस्तानने पुरुष क्रिकेटवर कोणतेही बंधन आणलेले नाही. मात्र त्यांनी महिला क्रिकेटवर बंदी आणली आहे. अफगाणिस्तानचे नागरिक क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. तालिबानने आणलेल्या या बंदी मुळे आता त्यांना आयपीएलचा आनंद घेता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार मोठे नेते नाहीत, शरद पवारांमुळे मिळालेल्या संधीची त्यांनी घाण केली-निलेश राणे
- राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’


