Share

धक्कादायक! ‘या’ तालुक्यातील शासकीय कार्यालयतील दूरध्वनी बंद; नागरिकांची गैरसोय

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बहुतेक सर्व शासकीय कार्यालयातील दूरध्वनी हे वर्षभरापासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दूरध्वनी बंद असल्याने शासकीय कार्यालयात अधिकारी आहे की नाही याची माहिती न मिळाल्याने शासकीय कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा त्रास होत आहे.

शासनाच्या कुठल्याही विभागातील सरकारी अधिकाऱ्याची बदली ही तीन वर्षाच्या अंतराने होत असते. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात दर तीन वर्षांनी नवीन अधिकारी कर्मचारी नियुक्त होत असतो. पण, प्रत्येक वेळी नवीन नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर सर्वसामान्य नागरिकांकडे उपलब्ध होणे शक्य नसते. या परिस्थितीत जर संबधित अधिकाऱ्याच्या कार्यालयातील दुरध्वनी सुरू असणे गरजेचे आहे. जर सर्व शासकीय कार्यालयातील (लँडलाईन) दूरध्वनी चालू अस्वस्थेमध्ये असतील तर सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार येण्याचे टाळता येऊ शकते. परिणामी शासकीय कार्यालयात होणारी गर्दी कमी होऊ शकते.

या गैरसोयीबद्दल सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. चिंतेची बाब म्हणजे तालुक्यातील महत्वाच्या अशा अग्निशामक कार्यालय, आरोग्य विभागातील दूरध्वनीही बंद अवस्थेमध्ये आहे. तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पोलिस स्टेशन मधील सुद्धा दूरध्वनी बंद अवस्थेमध्ये आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन परिस्थिती जर उद्भावली तर सर्व सामान्य नागरिक कुठे संपर्क करणार हा प्रश्न आहे. मात्र याला अपवाद आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय. या कार्यालयातील दुरध्वनी सेवा चालू आहे, तेव्हा तालुक्यातील इतर ही सर्वच्या सर्व शासकीय कार्यालयांनी याबाबतचे अनुकरण करण्याची मागणी किशोर तांगडे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!