मुंबई : मुंबई कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात रुग्णांना बेडसाठी वणवण भटकावे लागत आहे. बेड, आयसीयू व व्हेंटिलेटर मिळाले नाही म्हणून आतापर्यंत शेकडो गंभीर रुग्णांचा मृत्यु झाला. याच्या निषेधार्थ व कोरोना रुग्णांना सक्षम रुग्णसेवेसाठी शुक्रवारी भाजपा नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी व मास्क बांधून सुमारे एक तास मूक धरणे दिली.
राज्य सरकारने 21 मे रोजी परिपत्रक काढून खाजगी हॉस्पिटल मधील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र 14 दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खाजगी हॉस्पिटलमधील रूग्ण बेड, अतिदक्षता – व्हेंटिलेटर बेड मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत. याच्या निषेधार्थ
मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, नगरसेवक अतुल शाह, कमलेश यादव, अभिजित सामंत, सुनिल यादव, ऍड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत, अनीस मकवानी, नगरसेविका उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना, दक्षा पटेल, ज्योती अळवणी, राजश्री शिरवाडकर, नेहल शाह, नगरसेवक कमलेश यादव,अभिजित सामंत, सुनिल यादव,अॅड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत,अनीस मकवानी सहभागी झाले होते.
या नगरसेवकांनी मुंबईच्या महापौर,आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी व मास्क बांधुन एक तास मुक धरणे आंदोलन केले. कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर रूग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयु व व्हेंटिलेटर मिळाले नाही म्हणून आजपर्यंत शेकडो गंभीर रूग्णांचा मृत्यू झाल्याची आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. भाजप गटाने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार, व्हॉट्सऍप, ई मेल, ट्विट व प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने अद्याप खाजगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेतले नाहीत.
निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका, उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक
मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड म्हणजेच 16 हजार बेडस बाबत महापालिकेने श्र्वेतपत्रिका काढावी. हे बेड 24 तासात ताब्यात घ्यावेत, व त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी. हा डॅशबोर्ड मोबाइल ॲपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा. खाजगी हॉस्पिटलमधील कोविड रूग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे. या मागण्यांसह कोरोनाग्रस्त रूग्णांप्रती महापालिकेची संवेदनहीनता उजेडात आणण्यासाठी व सत्ताधीशांना जागे करण्यासाठीच भाजप नगरसेवकांनी धरणे आंदोलन केल्याचे भाजपा प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.
14 दिवसांनी कोरोनाग्रस्त रुग्णांचा विलगीकरण कालावधी संपतो पण महापालिकेतील सत्ताधारी, राज्यातील सरकार व प्रशासनाचा हा कालावधी कधी संपणार? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

