पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनाम करण्याच्या डाव फसलाय. या प्रकरणी साताऱ्यातील एका तरुणीला हाताशी धरून कट रचणाऱ्या पुण्यातील दोन, तर साताऱ्यातील एकाविरोधात सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे यातील संबधित तरुणीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर एका तरुणीच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावून त्यांची बदनामी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा डाव संबंधितांनी आखला होता. यासाठी संशयितांनी संबंधित तरुणीला एक लाख रुपये दिले होते. परंतु त्या तरुणीच्या मनाला ही गोष्ट न रुचल्याने तिने याबाबतची माहिती आ. मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते पाटील यांना दिली. यानंतर मयूर यांनी तत्काळ याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी शैलेश शिवाजी मोहिते पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि. पुणे) आणि सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे १२ एप्रिल रोजी संबंधित तरुणीला भेटण्यासाठी साताऱ्यात आले होते. त्यांनी आम्हाला दिलीप मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत आम्हाला लागणार आहे. तू त्यांच्या पुतण्याच्या माध्यमातून आमदारांकडे नोकरी माग व त्यांच्याशी घसट वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ. एकदा का आमदार जाळ्यात आले की आपण पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांना बदनामीची भीती घालू. त्यानंतर आ. मोहिते पाटील भरपूर पैसे देतील. त्या बदल्यात तुला पैसे, पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे आमिष तरुणीला आरोपींनी दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील गरीब जनतेला मोफत लस मिळणार का ? अजित पवार म्हणाले…
- रा. स्व. संघ राष्ट्रद्रोही संघटना आहे का ? चंद्रकांत पाटील यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

