रत्नागिरी : कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची संतापजनक घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा संतापजनक प्रकार नातेवाईकांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी सदर बाब जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कानावर घातली. यानंतर चौकशी केली असता चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्यानं दागिने लांबवल्याचं समोर आलं आहे. याबाबत चौकशी करत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करत रूग्ण सेवा केली.त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील होत आहे. मात्र हा घृणास्पद प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी सध्या होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची ‘धूम!’ नियमांची ऐशीतैशी करत ठाकरे सरकारला दाखवला ठेंगा
- ‘त्या’ घोषणेमुळे पंकजा मुंडे यांना राग अनावर, त्यांच्याच समर्थकांना म्हणाल्या, ‘मुर्ख कुठले!’
- सुष्मिता देव यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा’ काँग्रेसची भूमिका
- ‘भावनाताई, चोरी झालेली ७ कोटींची कॅश कोठून आली?’, किरीट सोमय्यांचा सवाल
- हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता यांनी घेतली राज्यपालांची भेट, केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

