🕒 1 min read
कोल्हापूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बचे राज्याच्या राजकारणात देखील मोठे पडसाद उमटत आहेत. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने समितीची घोषणा केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेवर भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील समितीच्या अधिकारांवर व दर्जावर आक्षेप घेतला आहे.
भाजप नेत्यांनी समितीवर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह भाजपचे डार्लिंग झाले आहेत, असा खोचक टोला मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे.
‘मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेले सचिन वाझे हे परमबीर सिंह यांचे जवळचे मित्र आहेत. संबंधित प्रकरणात परमबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होतं, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. यासोबतच, हे प्रकरण अंगाशी येत असताना फडणवीस आता गप्प का आहेत ? असा सवाल देखील हसन मुश्रीफ याबानी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईच्या लोकल सेवेबाबत विजय वडेट्टीवार यांनी केलं महत्वाचं भाष्य !
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
