Share

धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या…

Published On: 

चेन्नई : यावर्षी एकीकडे कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरु असून यामध्ये चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांच्या मृत्यूमुळे कलाक्षेत्राच कधीही न भरून निघणार नुकसान झाल आहे. या दरम्यानच चित्रपट सृष्टीतील गूढ आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. यामध्ये सुशांत सिंग आत्महत्या या प्रकरणाने देशभरात वातावरण ढवळून निघाल होत. तर राजकीय वळण मिळाल्याने हे प्रकरण अद्याप देखील एक गूढ च राहिले आहे. अशातच पुन्हा एका अभिनेत्रीची आत्महत्या समोर आली आहे.

दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत. तर एका मागून एक होत असलेल्या आत्महत्यांमुळे चाहत्यांना देखील कलाविश्वातील या धक्कादायक घटनांमुळे चाहते देखील धक्क्यातून सावरू शकत नाहीय.

चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या हॉटेलमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपतीसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला होता.

https://www.instagram.com/p/CIief1HHXgT/?utm_source=ig_web_copy_link

विजय टीव्हीवर सुरु असलेल्या पॅनडियन स्टोअर्स या मालिकेतील तिची मुख्य व्यक्तिरेखा चांगलीच गाजत होती. चित्राने साकारलेली मुल्लई ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातच चित्राने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय, सहकलाकार आणि फॅन्सही धक्क्यात आहेत.

चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि स्टोरीही शेअर केले होते. त्यानंतर तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!