औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहराजवळील सावंगी बायपासवर ही घटना घडली आहे. मंगेश संजय साबळे (रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) असे तरुणाचे नाव आहे. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास त्याने डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पुढाऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असताना मराठा समाजातून मात्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयात आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. तर केंद्र सरकारने तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरतेय.
अशातच औरंगाबादेत मराठा तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका युवकाने डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. शहराजवळील जळगाव रोडवरील सावंगी बायपासवर ही घटना घडली. मराठा आरक्षणासाठी आपण स्वत:ला संपवत असल्याचे तो ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. पण
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलीस आणि तरुणात झटापटही झाली.
दरम्यान, मंगेश साळवे हा प्रहार संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची आंदोलने करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार हरिभाऊ बागडे यांची गाडी त्याने अडवली होती. वडिलांच्या उपचारासाठी पैशाची मागणी मंगेशने केली होती. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. शिवाय त्यानंतर १९ सप्टेबंर २०१९ रोजी गेवराई पायगा या मुळगावी पाण्याच्या टाकीवर चढून त्याने शोले स्टाईल आंदोलन केले होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी मध्यस्थी करत पैशाची जमवाजमव केली.
तसेच काही महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी, २०२१ मध्ये मंगशे साबळे याने गावात सरपंच-उपसरपंचाच्या खुर्च्या पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मंगेशने हे कृत्य केले होते. त्याने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप तोडून ग्रामपंचायतीतील खुर्चा पेट्रोल टाकून जाळल्या. चित्रीकरण करून व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच फडणविसांनी घेतली भेट; राष्ट्रवादीची सारवासारव
- ‘मुल्क से बढकर कुछ भी नही’ त्या प्रकरणावर मितालीने सोडले मौन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

