Share

धक्कादायक : लॉकडाऊन काळात तब्बल ६० लाख नागरिकांनी गमावला रोजगार!

Published On: 

नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ‘कोव्हिड-१९’ या चिनी व्हायरसमुळे देशातील आर्थिक चक्र पुरते बिघडले आहे. भारताला २०२० साली महासत्ता देशांच्या यादीत बसवण्याचे अनेक दिग्गजांचे स्वप्न यामुळे लांबल्याचे दिसून आले. तर, या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लॉकडाऊन करावा लागला होता.

अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांवर याचा वाईट परिणाम झाला असून अनेक कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. यामुळे ‘व्हाईट कॉलर’ पेशा समजल्या जाणाऱ्या लाखो नोकरदारांना याचा फटका बसला आहे. ‘इंजिनीअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षकांसारख्या’ अनेक प्रकारच्या नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली असून हे कर्मचारी आता बेरोजगार झाले आहेत.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई या संस्थेने एक अहवाल जारी केला असून त्यात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारने जूनमध्येच अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यस्था सुधारण्यात अडथळे येत आहेत.

‘सीएमआयई’ म्हणते, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारात वाढ होत होती. २०१६ पासून सप्टेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये १९.७ दशलक्ष पंधरपेशे कर्मचारी भरले गेले होते. जानेवारी-एप्रिल २०२० या काळात ती घटून १८.१ दशलक्षवर आली, याकाळात करण्यात आलेला लॉकडाऊनचा सौम्य परिणाम या काळात दिसून आला. तर, मे-ऑगस्ट २०२० या काळात मात्र मोठी घसरण होऊन या कर्मचाऱ्यांची संख्या घटून ती १२.२ दशलक्षांवर आली. हा आकडा २०१६ नंतरचा नीचांकी असून तब्बल ६० लाख लोक हे बेरोजगारी ला सामोरे जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!