नाशिक: कोरोना रोगाच्या सरंक्षणासाठी अतिशय महत्वाचे असणाऱ्या पीपीई किटच्या निर्मिती होणाऱ्या कंपनीमध्येच कोरोनाने शिरकाव केल्याचे आता समोर येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार ते त्यांचे अंतिम संस्कार करेपर्यंत या रोगाच्या संसर्गापासून बचावासाठी डॉक्टर ते रुग्णालय कर्मचारी पीपीई किट चे वापर करत असतात.
आता, नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतील पालखेड औद्योगिक वसाहतीत पीपीई किट तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीतील तब्बल 44 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात टिव्ही ९ ने वृत्त दिले आहे. सर्व कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर कंपनीतील इतर कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला लॉकडाऊनमध्येही काम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त कर्मचारी आढळल्याने कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे.
‘राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनची चिंता वाढेल असं वाटत नाही’
एवढेच नाही तर आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. या कंपनीमध्ये मानवी स्पर्शाशिवाय सर्व काम होतात का? या पीपीई किट परिधान करून काम करणाऱ्या कोविड योद्धयाना लागण होण्याची भीती आहे का? या कंपनीत उत्पादन झालेल्या पीपीई किटचं काय होणार? त्याची तपासणी होणार का? गेल्या काही दिवसातील काही बॅचचा माल विकणे किंवा वापरावर बंदी येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!’ रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
दरम्यान, पीपीई किट हे सुरक्षित जरी असले तरी ७ ते ८ तासांहून जास्त काळ परिधान करून उपचार करणे हे खरच खूप कठीण आहे. पाण्याशिवाय तसेच टॉयलेटलाही न जाता हे सलग काम करावे लागते. एकदा वापरलेली पीपीई किट वैद्यकीय कचऱ्यात गांभीर्याने विल्हेवाट लावणे देखील तेवढेच महत्वाचे असते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
