पुणे: कोरोना महामारीने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तर, अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत युजीसीच्या भूमिकेमुळे अजूनही संभ्रम कायम आहे. यातच काही दिवसांपूर्वी अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे निकाल लावण्यात आले.
या निकालात अनेक त्रुटी असून पुणे विभागातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्ह्याध्यक्ष ऍड. करण मधुकर कोकणे यांनी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांना भेटून निवदेन दिले आहे. या निवेदनात, ‘ महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांना पास घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार नाही याची त्यांना खात्री मिळाली. पुणे विद्यापीठाकडून मात्र शासनाच्या निर्णयाला केराची टोपली मिळाल्याचे दिसत आहे.’
‘त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!’ रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
तसेच, ‘अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील असंख्य विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नापास केले आहे. पुण्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानविसेकडे याबाबत तक्रार केली असून विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासन प्रतिसाद देत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडे त्यांनी तक्रार केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जाऊन विद्यापीठाने निकाल कसा लावला? हा गंभीर प्रश्न असून विद्यापीठाने त्वरित कार्यवाही करत या विद्यार्थ्यांना पास करून त्यांचे धोक्यात असलेले भवितव्य वाचवावे.

दरम्यान, ‘ हे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली असून, विलंब न करता निर्णय घेण्यात यावा अशी विनंती मनविसेकडून करण्यात केली आहे. जर विनंती करून हि मागणी मान्य करण्यात आली नाही तर थेट विद्यापीठाच्या परीक्षा विभागात येऊन जाब मागण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे चुकीच्या निकालाचा खुलासा करून सुधारित निकाल त्वरित देण्यात यावे.’ अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस द्वारे कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. पुणे विभागातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान चुकीचे लागल्याचे आता समोर येत असून विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.
‘राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनची चिंता वाढेल असं वाटत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
