Share

‘त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!’ रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका

Published On: 

मुंबई: काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही”, असे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते.

तर, यावर आज राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता पाच वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!”, यातून त्यांनी भाजपासह चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला असून त्यांच्या कालच्या वक्तव्याची खिल्ली देखील उडवली आहे.

राम मंदिराच्या भूमिपुजानाबाबत जी मागणी एमआयएमने केली आहे तीच मागणी मुख्यमंत्री का करत आहेत?

दरम्यान, सामनातून, “भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.” असा समाचार देखील घेतला आहे.

४०% मुंबईकरांचा कोरोना आपोआप गेला? अँटीबॉडी चाचण्या करा, सत्य समोर येईल, आशिष शेलरांचा प्रशासनावर घणाघात

तसेच,  “दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरु आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे!”, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर दिला आहे.

गणेशोत्सव : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!