औरंगाबाद : धामणगाव येथे विजेच्या खांबावर वायरची जोडणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. हि माहिती गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याचे प्राण वाचवले. आजीनाथ भागाजी भोजने गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान धामणगाव येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी आले होते. त्याच दरम्यान कृषी पंप सुरू करण्यासाठी विद्युत प्रवाह नसल्याने ते वायर जोडणी करण्यासाठी वीजेच्या खांबावर चढले. या वेळी एका फिडर मध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा झटका बसला.
त्यामुळे भोजने विजेच्या खांबाला खालच्या तारीवर चिटकले. भोजने खांबाच्या तारेवर अडकले होते , ते पाहून गावकऱ्यांनी धाव घेत तारेवर अडकलेल्या भोजनेला बांबूच्या सहाय्याने खाली पाडले नंतर त्यांना फुलंब्रीच्या एका खासगी रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. सध्या भोजनेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- #Breaking : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्र्याची करोडो रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

