टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अशातच जलसंधारण मंत्री आणि शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी युतीविषयी मोठ विधान केले आहे.
मंगळवेढा येथे शिवसेनेच्यावतीने शेतकरी मेळावा आणि तानाजी सावंत यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंत बोलताना सावंत यांनी ‘कुणी म्हणेल मी अमुक ह्याच्या जवळचा आहे, मी तमुक ह्याच्या जवळचा आहे, कुणी काहीही म्हणू दे, शिवसेना १९९५ ते २००० साली लढवलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही नसल्याचे सांगत आमचंही ठरलंय, अस विधान केले.
तानाजी सावंत यांच्या या विधानामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याच्या जागा भाजपला सोडणार नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे युतीतील जागावाटपात यामुळे तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोनही पक्ष जरी युती होणारच अस विधान करत असले तरी अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे युतीत तेढ निर्माण होऊ शकते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमच्या मित्रपक्षांच्या जागा सोडून सेना – भाजपमध्ये निम्म्या जागांचं वाटप होईल. पण आमच्या दोघांमधील सिटिंग जागांमधल्या काही जागा सोडून आम्ही वाटप करू. त्यात आमच्या काही जागा त्यांना जातील तर त्यांच्या काही जागा आमच्याकडे येतील अस विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिवरायांचा आदर्श घेवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे : अमोल कोल्हे
मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीने उडवली भाजप-सेनेची खिल्ली
कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज : गिरीश महाजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

