Share

Shiv Sena vs MNS : बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार कोण? बाळा नांदगावकर यांचा मोठं वक्तव्य!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या प्रत्येक हालचालीवर मनसेकडून जोरदार टीका केली जात आहे. शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून ही पाचवी वेळ आहे जेव्हा शिवसेनेत बंड पुकारण्यात आला. छगन भजुबळ, त्यानंतर नारायण राणे, राणे यांच्यानंतर राज ठाकरे, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा आतापर्यंतचा शिवसेनेतील सर्वात मोठा बंड मानला जात आहे. शिंदे हे आपल्यासोबत तब्बल ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली. यानंतर शिंदे गट विरुध्द उरलेली शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला. आता राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे राजकीय वारसदार असा सूर मनसे नेत्यांनी लावलाय. तर भाजप नेत्यांचाही कौल काही सात तासाच दिसतोय. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज एक मोठा विधान केलंय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडूनही शिवसेनेवर वारंवार टीका केली जात आहे. यानंतर आता बाळा नांदगावकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे राजकीय वारसदार आहेत. हे मी आज नाही वर्षानुवर्षे सांगत आलो आणि पुढेही बोलत राहणार. त्याची कारण अशी की ते त्यांच्या अंगा खांद्यावर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना बाळासाहेबांची पूर्ण भावना आणि भूमिका माहिती आहे. बाळासाहेब हे काही व्यक्ती नव्हते तर ते एक विचार होते. ते एक आमच्यावरती संस्कार होते. बाळासाहेब हे एक आम्हाला घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार कोण? असा वाद पूर्वीपासूनच चालत आला आहे. अनेक वेळा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना केली जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेंकडे भाषण कौशल्य तसेच आक्रमकपणे पाहायला मिळतो. बाळासाहेब विरोधकांना ज्याप्रमाणे सडेतोड उत्तर द्यायचे तीच शैली राज ठाकरे त्यांच्या सभांमध्ये वापरताना दिसतात. व्यासपीठावरून विरोधकांचा समाचार घेताना दोघांमध्येही सारखाच आक्रमकपणा पाहायला मिळतो. त्यामुळे नेमके शिवसेनेचे राजकीय वारसदार कोण असा सामान्य जनतेला प्रश्न पडला होता. मी शिवसेना बाळासाहेबांच्या आजूबाजूंच्या लोकांमुळे सोडली असे आजही जाहीरपणे राज ठाकरे सांगतात. शिवसेनेत मोठा बंड झाल्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे राज की उद्धव असाच पेच पुन्हा निर्माण झालेला दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!