🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. यानंतर राज्यातील राजकारणात पूर्ण उलथापालथ झाली. आजवर कधी नव्हती इतकी अस्पष्टता शिवसेनेच्या भवितव्याबद्दल दिसते आहे. या अस्पष्टतेला कारण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या मनात सुरु असलेला गोंधळ असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खास शैलीत टिपण्णी केली. फडणवीस म्हणाले कि, “मी फिक्स मॅच पाहत नाही. मी फक्त लाईव्ह मॅच पाहत असतो. जी मॅच आधीच फिक्स आहे, ती पाहून मग त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवासांनी आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील, तेव्हा आम्ही प्रतिक्रिया देऊ.”
प्रसाद लाडांची प्रतिक्रिया
“बॅट पण माझी, बॉल पण माझा अन् अंपायर पण माझाच. तसंच उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे वृत्तपत्र पण माझंच, मुलाखत पण माझीच आणि जगप्रसिद्ध संपादक पण माझाच. त्यामुळे उद्धवजी अशा प्रकारच्या मुलाखती देऊन आता चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक जिंकली आणि त्यांनीच २०१९ ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे ठाकरेंनी खंजिराची भाषा करूच नये”, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
- Shambhuraj Desai : आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर, आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; शंभूराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना आवाहन
- Sanjay Shirsat : “तुम्ही बाळासाहेबांची उंची कमी करु नका, ते फक्त तुमचेच नाहीत तर… “; संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला
- Sanjay Raut | सरकार स्थापन होऊन १ महिना झालं तरी मंत्रिमंडळ बाळंत होईना – संजय राऊत
- Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत; संजय शिरसाट यांचं गंभीर विधान
- Uddhav Thackeray | राणे आणि भुजबळ जे करू शकले नाहीत ते शिंदेंनी कसे केले ? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण


