Share

Sanjay Raut | सरकार स्थापन होऊन १ महिना झालं तरी मंत्रिमंडळ बाळंत होईना – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन २५ दिवस लोटले. मात्र अजूनही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या २५ दिवसात अनेकदा दिल्ली दौरे केले. प्रत्येक वेळेस वाटायचे कि आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, पण तसेच झाले नाही. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक शब्दात टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, “महाराष्ट्रात अनैतिक संबंधातून निर्माण झालेलं सरकार आलं. त्यालाच सोप्या भाषेत अनैसर्गिक म्हणतात. सरकार स्थापन होऊन १ महिना होत आला तरी या सरकारचा पाळणा हालत नाहीये. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत पाळणा हालवायचे प्रयत्न सुरु आहेत, तरी पाळणा हालत नाही. अजूनही सरकारचं मंत्रिमंडळ बाळंत होत नाही.” उद्धव ठाकरेंनी याच संदर्भात मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे आणि अजून उद्याचा भाग यायचा आहे, त्यामुळे उद्याचा भागही बघा, असे देखील त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी अजित पवार काय म्हणाले
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारला खडे बोल सुनावले होते. “जर तुमच्याकडे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार करण्यापासून तुम्हाला कुणी अडवलं आहे का? अधिवेशन घेण्यापासून कुणी अडवलं आहे?, असे संतप्त सवाल अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना विचारले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!