🕒 1 min read
Sanjay Shirsat । मुंबई : आज शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. यावेळी बंडखोरांनी स्वतःच्या आईवडिलांना घेऊन मत मागवीत, माझे वडील का चोरताय ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर ठाकरेंच्या या टीकेला आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलय.
संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय. ते म्हणाले कि, आज उद्धव ठाकरेंची मुलाखत पाहिली. मुलाखत घेणाऱ्याच आश्चर्य वाटल. तसेच शिवसेना प्रमुख हे आमचे आहेत. असं त्यांनी सांगितले, पण ते फक्त त्यांचेच नाहित संपुर्ण जगाचे आहेत. आज मुख्यमंत्री कार्यालयात जा तिथे गर्दी बघा, बाळासाहेबांचं फोटो बघा, कृपया आज त्यांची उंची तुम्ही कमी करु नका. एखाद्याला खाली खेचायच काम तुम्ही कमी नका करु. शिवसेना प्रमुख आमचे दैवत आहेत, असं शिरसाट म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, या मुलाखतीत शिंदे गट बाळासाहेबांवर हक्क सांगतोय का, असा प्रश्न राऊतांनी विचारला असता, त्यावर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिलंय. ठाकरे म्हणाले, माझं आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाने मातृ देवो भव, पितृ देवो भव हे मानलं पाहिजे. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत, मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?, असा सवाल त्यांनी बंडखोरांना केला.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | सरकार स्थापन होऊन १ महिना झालं तरी मंत्रिमंडळ बाळंत होईना – संजय राऊत
- Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत; संजय शिरसाट यांचं गंभीर विधान
- Uddhav Thackeray | राणे आणि भुजबळ जे करू शकले नाहीत ते शिंदेंनी कसे केले ? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- 5G Spectrum | पहिल्यांदाच अंबानी-अदानी समोरासमोर; 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू
- Shahjibapu Patil : संजय राऊतांचे पाऊल आमच्या छाताडावर यायच्या आत त्यांच्या डोक्यावर आम्ही पाय देऊ – शहाजीबापू पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

