नागपूर: ओबीसीच्या (OBC) सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने मोर्चे घेण्यात आले. राज्यभरातील सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांचा व कार्यकर्त्यांचे ओबीसींचे सामाजिक संघटन असावे, असा आग्रह होत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहामध्ये महाराष्ट्रामधील प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्या दिवशी महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लढणारे संघटन म्हणून नविन संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि व्हीजेएनटी या बहुसंख्येने असणाऱ्या समुहाला आपले संविधानीक हक्क व अधिकार, शिक्षण नोकऱ्या आणि पंचायत राजमधील आरक्षण या संदर्भात घटनात्मक हक्काविषयी जागृत करणे हे महत्वाचे उद्दिष्ट या संघटनेचे असणार आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
‘आमंत्रण जेवणाचं अन् ताटात आला वडापाव’; सदाभाऊ खोतांचा राऊतांना टोला
मुख्यमंत्र्यांना हटवण्याची संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे; नारायण राणेंचा गंभीर आरोप
पातुर्डा शिवारात पुन्हा आढळले अस्वल, शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण


