मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांना ’50 खोके’, ‘गद्दार’ असं संबोधलं जात आहे. याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप पक्षाचे नेते नारायण राणेही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे गटाने गद्दारी केली नाही तर, उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना आमदार आणि पक्षाशी खरी गद्दारी केली आहे. त्यांनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यावर शिवसेना पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवाजीराव चोथे यांचं नारयण राणे यांना प्रत्युत्तर-
बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं. त्यामुळे मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करण्याची आवश्यकता नाही, असं शिवाजीराव म्हणाले आहेत.
त्याचप्रमाणे नारायण राणे आणि मी 1995 साली एका सरकारमध्ये होतो. ते एक मंत्री होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री कसे झाले? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली? हे राणेसारख्या माणसानं महाराष्ट्रातील जनतेला शिकवू नये.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे बछडे-
तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक हे वाघ आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे सारख्या वाघाचा बछडा असल्याचंही शिवाजीराव चोथे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । तुमच्यात दसरा मेळावा घेण्याची हिंमत आहे का?; शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटाला आव्हान
- Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे
- Jayant Patil । “भाजपाला हिंदूत्वाशी घेणे-देणे नाही, तर…”; जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण
- Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा
- Eknath Shinde । विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा


