मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षामध्ये दरी निर्माण झाल्यामुळे यावर्षी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा शिवाजी पार्कवर. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. अशातच शिवसेना पक्षाने मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखामधून भाजप पक्षावर जोरदार हल्ला केला आहे.
सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांना केलं लक्ष्य
मुंबई आम्हीच जिंकणार, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहणार, असं म्हणत शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. सामना अग्रेलखातून दसरा मेळाव्याच्या आधीच विरोधकांना लक्ष्य केलं गेलं आहे.
शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपाच्या कमळाबाईंनी केले
तसेच, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढ्य संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपाच्या कमळाबाईंनी केले. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राचे भवितव्य जर कुठे निर्माण झाले असेल तर याच रणमैदानावर, याच रणक्षेत्रावर. संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच मैदानावर सुरू झाला आणि याच मैदानावर पूर्ण झाला. शिवसेनेचे प्रत्येक रणशिंग बाळासाहेबांनी याच मैदानावर फुंकले. आता शिवसेनेच्या नव्या लढ्याची नांदी याच ठिकाणी होत आहे
‘वंदे मातरम्’चा हाच खरा अर्थ आहे. महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? आज महाराष्ट्रात पूर्णपणे बेकायदेशीर सरकार सत्तेवर लादले गेले आहे. शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्र स्वाभिमानी संघटना मोडून टाकायच्या व त्यासाठी गद्दारांना बळ द्यायचे, याच हेतूने सर्व राजकारण चालले आहे. मुंबई त्यांना जिंकायचीच नाही, तर गिळायची आहे. त्यांची भाषा तशीच आहे. सेनापती बापट यांनी एक मंत्र दिला होता- महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले. या काव्यात थोडा बदल करून प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटले होते- महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मुंबई गेली तरी महाराष्ट्र मेला, आज भाजपाची पावले त्याच दिशेने पडत असल्याचं अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jasprit Bumrah । टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर बुमराहनं मौन सोडलं; हृदय जिंकणारा संदेश शेअर केला
- Shivsena । आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
- Shivsena । दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या
- Weight Loss Tips | दररोज ‘ही’ योगासने केल्यामुळे होऊ शकते पोटावरील चरबी कमी
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी


