🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :आजकाल वजन वाढणे किंवा पोटाची चरबी वाढणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. पण यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. वाढत्या वजनामुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम दिसू लागतात. पोटाची चरबी वाढल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकतात. बराच वेळा शरीरावरचे वजन कमी होते पण पोटाची चरबी मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही. पण योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य योगासने करून तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकतात.
पुढील योगासने पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करू शकतात
गोमुखासन
गोमुखासन नियमितपणे केल्यावर तुम्ही शरीरातील अनेक वेदनांपासून सुटका मिळू शकतात. कारण हे आसन केल्यामुळे आपली बॉडी स्ट्रेच होते. आणि त्यामुळे पोटावरची चरबी देखील कमी होऊ लागते. या आसनामुळे तणाव आणि चिंता देखील दूर होते.
त्रिकोणासन
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी नियमित त्रिकोणासन करावे. त्रिकोणासनामुळे तुमचा मानेपासून पाठीपर्यंतचा व्यायाम पूर्ण होतो. या योगासनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.
कुंभकासन
प्रामुख्याने खांदे आणि हात मजबूत करण्यासाठी तुम्ही हे आसन करू शकतात. या आसनामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. दररोज हे आसन केल्यामुळे पोटावरील स्नायू मजबूत होऊन पोटावरची चरबी कमी होऊ लागते.
मार्जरी आसन
या योगासनाला कॅट पोज असेही म्हणून ओळखले जाते. हे आसन प्रामुख्याने मनगट आणि खांदे मजबूत करण्यासाठी केले जाते. या आसनामुळे शरीर मजबूत आणि लवचिक बनते. हे आसन केल्यामुळे पाठीचा कणाही मजबूत होतो.
विपरीतकर्णी आसन
हे योगासन नियमित केल्याने पोट साफ राहते. या आसनामुळे शरीर मजबूत राहते आणि मन शांत होते. त्यामुळे पोटावरील जमा झालेली चरबी कमी होते.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी
- BJP | “एकीकडे भारत जोडो म्हणतं पदयात्रा काढायची आणि दुसरीकडे…”; भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
- Supriya Sule | “देशात नोटबंदी, तरी शिंदे गटाकडे १० कोटींची कॅश आली कुठून?”; सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल
- Health Tips | रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस प्या, आणि अनेक आजार दूर करा
- Rupali Thombare | “जेलात गेलो पण भाजपात गेलो नाही…”, देशमुखांच्या जामीनवर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
