Share

‘पाच दिवसांच्या कामकाजाने सरकारी तिजोरीत होणार मोठी बचत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. त्यानंतर अनेक स्तरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे सरकारच्या या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे पण दुरीकडे पाच दिवसांचा आठवडा केल्याने कामकाज सुरळीत चालणार का? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे.

याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. ‘कामकाजाचा एक दिवस कमी करताना उर्वरित पाच दिवस कामाचे तास वाढवून देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. किती कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची पद्धत आहे. मोठ्या शहरांतील काही कार्यालये सोडली तर कुठेही ही पद्धत नाही. कर्मचारी कार्यालयात कधी येतात, कधी जातात याचा काहीही हिशेब नसतो.’

मात्र कडू यांनी घेतलेल्या आक्षेपावर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. सरकारने ५ दिवसांचा आठवडा केला असला तरी त्याचसोबत कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत ४५ मिनिटे प्रतिदिन वाढवण्यात आली आहे. कर्मचारी त्यांचे काम करतील. पण बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मुल्यमापन करायचे झाले तर ते करणार कसं? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत मोठी बचत होणार आहे. प्रशासकीय कार्यालयातील एक दिवसाचा खर्च वाचणार आहे. यामध्ये वीज बिल, पाणी बिल, वाहनातील इंधन खर्च असं कोट्यवधी रुपये वाचणार आहेत असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!