मुंबई: गेली कित्येक दशके राम मंदिराचा वाद चालू होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल अखेर लागला व राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला होता. आता ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. हा सोहळा आता अवघ्या काही तासांवर आला आहे. तर, शिवसेनेने राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या १ कोटीपैकी १ रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं होत.
यावर आता शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ६० व्या जन्मदिवशी २७ जुलैला ही रक्कम श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात टाकण्यात आल्याचे देसाई म्हणाले. ही रक्कम मिळाल्याची माहिती देखील आमच्याकडे आल्याचे देसाई म्हणाले. यासंदर्भात झी २४ तासने वृत्त दिले आहे.
सामना अग्रलेख: सत्ता गेल्याने त्यांची डोकी कामातून गेली आहेत; भाजपावर जहरी टीका
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी, ‘नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा,’ असं ठाकरे म्हणाले होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन!
श्रीराम मंदिराच्या विषयावर विश्व हिंदू परिषद व भाजपकडून शिवसेनेला लक्ष करण्यात आले होते. यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना, ‘शिवसेनेसाठी राममंदिर हा राजकारणाचा नव्हे तर श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे’ असं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे. तसंच, जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोध्येला गेले होते, त्यामुळे हा श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रश्न आहे, अशी आठवण करून एकनाथ शिंदेंनी टोला लगावला होता.
संयम ठेवून आहोत…नाही तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ; शिवसेना नगरसेवकाने दिला मनसेला ईशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

