Share

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन!

Published On: 

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचं वृद्धापकाळ्ने निधन झालं आहे. त्यांचं वय 75 होतं. मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री 11 वाजता अनघा यांचं निधन झालं. दादर इथल्या स्मशानभूमित त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अनघा मनोहर जोशी या माहेरच्या मंगल हिगवे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. मनोहर जोशी यांच्याशी 14 मे 1964 रोजी अनघा यांचा विवाह झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे.

संयम ठेवून आहोत…नाही तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ; शिवसेना नगरसेवकाने दिला मनसेला ईशारा

मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरु झाली. 1968 मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खास मानले जायचे.

धक्कादायक : कोरोनावर मात करणाऱ्या शिवसेनेच्या ‘त्या’ बड्या नेत्याचे निधन

तर, शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोलले जाते.

राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!