Share

संयम ठेवून आहोत…नाही तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ; शिवसेना नगरसेवकाने दिला मनसेला ईशारा

Published On: 

ठाणे: काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर त्यांना ठाण्यात खंडणीविरोधी विभागाने कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. कोरोनाच्या काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं होताना दिसत होते. त्यामुळे अविनाश जाधव यांना आज (सोमवार) पर्यंत पोलीस कोठडी देखील करण्यात आली आहे. यानंतर, मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसेच्या अनेक नेत्यांनी हि कारवाई पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुडाच्या राजकारणी भावनेतून केल्याचा आरोप लावला होता. तसेच, ज्यावेळी अविनाश जाधव यांना कोर्टात नेण्यात येत होते, तेव्हा पालकमंत्री शिंदेंच्या विरोधात घोषणा देखील दिल्या. या मनसेच्या टीकेला आता शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहस. मंत्री शिंदेंच्या विरोधात टीका केली, तर शिवसेना स्टाईलने चोप दिला जाईल, असे महेश गायकवाड म्हणाले. त्यामुळे आता या वादावरून शिवसेना-मनसे आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे.

धक्कादायक : कोरोनावर मात करणाऱ्या शिवसेनेच्या ‘त्या’ बड्या नेत्याचे निधन

दरम्यान, “पालकमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर, सांगलीचा पूर असो किंवा आता आलेले कोरोना संकट असो, अशा प्रत्येक वेळी आपला जीव धोक्यात घालून काम केल आहे. त्यांना कुणाच्या पोचपवतीची गरज नाही, “सध्या कोरोना संकट असल्याने शिवसैनिक संयम ठेवून आहेत. पण याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि सहन करू असे नाही. या पुढे जर टीका केलीत तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ,” असा घणाघात करत शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी इशारा देखील दिला आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठी ने वृत्त दिले आहे.

राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…

तर, “सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार”, अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती.

गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा – गृहराज्यमंत्री

अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस व अटक का करण्यात आली?

महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत, आपली बाजू देखील मांडली. तसेच, या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांना हि नोटीस देण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!