Share

महापुरात घर पडलं शाळेची पुस्तकही वाहिली, मोडलेला संसार उभारायला शिवसेना धावली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुरानं अक्षरशः थैमान घातले. लाखो लोकांना पुरामुळे स्थलांतरित करावं लागलं. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता विदारक चित्र समोर येत आहे. अनेक घरांची पडझड झाली असून घरातील सर्व साहित्य वाहून गेलं आहे. यामध्ये मोडलेले संसार उभारण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत.

पुरामुळे शाळेचं दप्तर भिजलं म्हणून रडणाऱ्या कोल्हापूरमधील काव्यांजली कांबळे या चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांकडून काव्यांजलीला वह्या-पुस्तकं दिली आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी केली जात आहे. वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना नेते रुपेश म्हात्रे यांनी काव्यांजलीच्या सिद्धार्थ नगर येथील घराला भेट दिली. यावेळी घराची झालेली पडझड पाहून काव्यांजलीचे घर शिवसेना नव्याने बांधून देणार असल्याची घोषणा त्यांनी तात्काळ केली.

चिमुरडीचं घर उभारण्याच्या कामाची सुरुवात म्हणून रोख स्वरुपात 2 लाख रुपयांची मदतही म्हात्रे यांनी केली. तसेच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ जे.बी. भोर यांनीही रोख 25 हजार रुपयांची मदत दिली आहे. त्यामुळे सामन्यांच्या मदतीला धावून जाण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण सेनेचे शिलेदार सत्यात उतरवताना दिसत आहे.

दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून कोल्हापूर व सांगलीच्या पूरग्रस्त भागात आरोग्य शिबीरं घेत नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गेली 10 दिवस कोल्हापूर व सांगलीच्या भागामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी तळ ठोकून आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!