औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात २० क्यूबिक प्रति तास ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास वैजापूरची तालुक्याची शंभर टक्के गरज वैजापुरमधूनच भागणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक केएम मालिकार्जुन प्रसन्ना, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटिल यांचा वैजापूर दौरा झाला होता. वैजापुर कोव्हिड केअर सेंटर येथे भेटी दरम्यान विविध समस्या बाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निवारण केले. त्याच बरोबर कोव्हिड व्हॅक्सिन आणि ऑक्सिजन सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सिलेंडर ऐवजी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले. हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प वैजापूरकरांसाठी लाभदायक ठरणार आहे. या प्रकल्पातून दोनशे लीटर ऑक्सिजन प्रति तासाला निर्माण होणार आहे. या प्रकल्प हा डीपीडीसी किंवा सीएसआर फंड द्वारे होणार आहे. या प्रकल्पासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरातच उभारला जाणार आहे. या प्रकल्पच्या निर्मितीसाठी येत्या काही दिवसात एक टीम येणार असून निरीक्षण करून अहवाल सादर करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

