मुंबई : सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर सुशांतपासून विभक्त झालेली गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील नेहमी चर्चेत होती. १४ जून रोजी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांत च्या अचानक जाण्याने चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला होता. तर यामागे बॉलिवूड मध्ये मिळालेली वाईट वागणुक कारण असू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केल्या नंतर मुंबई पोलिसांनी शक्य त्या सर्व बाजू तपासण्याचे काम सुरु केले होते. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी देखील जोर धरत होती. मोठ्या राजकीय आणि बॉलीवूड वाद विवाद नंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्य याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. आणि अखेर हे प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्यात आले होते.
या दरम्यान सुशंतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील वेळोवेळी आपली भूमिका व्यक्त करत होती. सुशांत आणि अंकिता सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे ‘झी रिश्ते अवॉर्ड्स २०२०’ मध्ये. अंकिताने सोशल मीडियावर रिहर्सलचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे एका डान्सच्या माध्यमातून सुशांतला ट्रिब्यूट दिला आहे.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर सध्या अंकिता लोखंडे सोशल मीडिया वर नेहमी चर्चेत आहे. त्याच बरोबर अंकिता नेहमी वेगवेगळ्या पोस्ट च्या माध्यमातून सोशल मिडियावर एक्टिव देखील असते. आता पुन्हा एकदा हि अभिनेत्री चर्चेत आहे ती तिच्या नृत्यामुळे वास्तविक, अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी सुशांतसिंग राजपूत यांना ‘झी रिश्ता अवॉर्ड्स’मध्ये तिच्या नृत्यामध्ये श्रद्धांजली दिली, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवरून व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे स्टेजवर व्हाईट आउटफिट परिधान करताना दिसली आहे.
https://www.instagram.com/p/CIfmeLPhsKU/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूत यांच्या ‘कौन तुझे’ गाण्यावर नाचत आहेत. व्हिडिओ सामायिक करताना अभिनेत्रीने झलक या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, लोक अंकिता लोखंडे यांच्या या व्हिडिओवर भाष्य करीत आहेत आणि आपला अभिप्राय देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- ‘शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात’
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- खा. शरद पवारांच्या नावाने महाविकास आघाडी सरकार लागू करणार योजना

