Share

‘शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला’

Published On: 

पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच राज ठाकरे पहाटे मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले.

बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र संगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

बाबासाहेब मला नेहमी सांगायचे, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची…शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं म्हणत राज ठाकरेंनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना भावूक पोस्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!