Share

शिवजयंती : पन्हाळा गडावरून शिवज्योत नेण्यास बंदी नाही, मात्र…

Published On: 

🕒 1 min read

पन्हाळा : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. या दिवशी राज्यभरातील शिवभक्त हे विविध गडकिल्ल्यांवर शिवज्योत घेऊन जातात व हीच शिवज्योत प्रज्वलित करून आपल्या गावी जात असतात. कोल्हापुरातील पन्हाळा गडावर देखील कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात. हे तरुण शिवमंदिरापासून शिवज्योत आपापल्या गावी घेऊन जात असतात.

मात्र, यंदा शिवजयंती साजरा कोरोनाच सावट असल्याचं दिसून येतंय. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पन्हाळा गडावर येण्यास बंदी असल्याचे मेसेज सोशल मिडियातून पसरले होते. गडावरून शिवज्योत नेण्यास कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

गडावर येण्यास बंदी नसली तरी गर्दीमुळे कोरोनाचा असलेला धोका बघता मोठ्या संख्येने येण्याचं टाळावे असं आवाहन नगराध्यक्षा रुपाली घडेल यांनी केले आहे. ढोल, ताशा, नगारा आणि खडया आवाजातील पोवा़ड्यांनी कडेकपारी दुमदुमत असते. रात्री वाहतुकीची कोंडी होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्योती नेण्यासाठी येणा-या मंडळानी शक्यतो येवू नये, आपापल्या गावी शिवजयंती साजरी करावी, पन्हाळगडी देखील अत्यंत साधेपणाने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात  येणार आहे, असं रुपाली घडेल म्हणाल्या आहेत.

गडावरील सर्व पुतळयांना शिवजयंतीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी सव्वादहा वाजता परंपरेनुसार येथील ताराराणी राजवाड्या समोरील शिवमंदिरात जन्मोत्सव व साजरा होणार आहे. पण पालखी, मिरवणूक आदी आदी कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!