🕒 1 min read
नागपूर:- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती.
राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, राज्यपाल पदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. आता या सर्व प्रकारावर मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपाल गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही’, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- तब्बल ५३ वर्षानंतर मिळाले हरवलेले पाकीट


