Share

‘राज्यपालांचं वय पाहता त्यांनी राजभवनातच राहिलं पाहिजे’

Published On: 

नवी दिल्ली : राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळे  राज्यपाल पदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. यावरून भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली  आहे.

दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य केले आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आले. सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणे’, हा अहंकार आहे का, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपाला फटकारले आहे.

‘कोरोनाचा धोका असल्यामुळे आपण सरकारी विमानाने प्रवास करण्याचे ठरवले’, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. मात्र, खासगी विमानात कोरोनाचा धोका नाही, असे कोणी सांगितले आहे का’, असे म्हणत राज्यपालांना कोरोनाची भीती वाटत असेल तर, त्यांचं वय पाहता त्यांनी राजभवनातच राहिलं पाहिजे अशी, कोपरखळी राऊत यांनी मारली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!