Share

राष्ट्रवादी सोडल्यानंतर उदयनराजे पहिल्यांदाच घेणार शरद पवारांची दिल्लीमध्ये भेट !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उदयनराजे-पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर उदयनराजे भोसले हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत.

महत्वाचं म्हणजे या दोन्ही नेत्यांची भेट ही दिल्लीत होणार आहे. या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असलं तरी उदयनराजे यांचे बंधू व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. आता उदयनराजे हे थेट राष्ट्रवादीच्या प्रमुखांची भेट घेणार असल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

उदयनराजे भोसले आज संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी भेटीला जातील. उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार असल्याने या भेटीला विशेष महत्त्व आहे. २०१९ मध्ये उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे हे राष्ट्रवादीकडून खासदार होते. मात्र, त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंच्या पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!